आनंदायी शिक्षण
926 videos • 387 views • by आनंदाचं झाड शाळा म्हणजे आनंद! शाळा म्हणजे नवल! शाळा म्हणजे कुतूहल! शाळा म्हणजे आनंदाची डहाळी! शाळा ही लेकरांच्या आंगणातलं 'आनंदाचं झाड ' व्हावं. मुलांना स्वतः हून यावसं वाटेल, आनंदानं शिकावंसं वाटेल असं सुंदर ठिकाण आपल्या हातून व्हावं असं अगदी गुरुजी झाल्यापासूनच किंबहुना शालेय शिक्षण घेत असल्यापासूनच वाटायचं..... शिक्षण ही एक आनंददायी घटना आहे.. याची जाणीव लेकरांना अगदी बालपणापासूनच करून दिली ,तर भविष्यातील स्वतः ची दिशा स्वतः च निवडतील. अशी मनाची धारणा तयार झाली आहे. यासाठी आनंदाचं झाड ही संकल्पना जन्मास आली. याद्वारे आनंददायी शिक्षण मुलांना देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आपणही हे पाहावं आणि आपल्याही लेकरांना आनंद द्यावा.ही इच्छा.